पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पानिपत' पुन्हा वादात, बंदीची मागणी

पानिपत

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट पुन्हा वादात सापडला आहे. या चित्रपटात जाट राजा महाराज सुरजमल यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी  भाजपचे आमदार विश्वेंद्र सिंग यांनी केली आहे. चित्रपटाविरोधात राजस्थानमधील भरपूरमध्ये निदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील या 'पानिपत'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला 'मिस युनिव्हर्स २०१९'चा किताब

 एक महान जाट राजा सुरजमल यांचं चित्रपटात केलेलं चित्रण अत्यंत बेजबाबदार आहेच पण त्याचबरोबर ऐतिहासिक पुराव्यांचीही  पायमल्ली केलेली आहे, असं आमदार विश्वेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. तर सुरजमल यांचं  या चित्रपटात केलेलं चित्रण अतिशय निंदनीय असल्याचंही वसुंधरा राजे म्हणाल्या. 

Happy Birthday : कधी पडद्यावरची खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आई

 पानिपत हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारलेला आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अर्जुन कपूर, क्रिती सॅनॉन, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत.