पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हो हे खरंय! त्या निर्मात्याला माझ्या पोटावर अंडं फ्राय करायचं होतं, मल्लिकाचा खुलासा

मल्लिका शेरावत

बॉलिवूडपासून गेले काही काळ दूर असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावात तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.  अल्ट बालाजीवर तिची 'बू सबकी फटेगी' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. बॉलिवूडमधली एक बोल्ड अभिनेत्री म्हणून मल्लिकानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  साधरण दहा एक वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये बोल्ड दृश्यांचा ट्रेंड यायचा होता त्यावेळी मल्लिका ही आपल्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जायची.

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकची वर्णी, होणार 'सीक्वलचा राजा'

नुकतीच तिनं 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या शोमध्ये उपस्थिती लावली. या क्षेत्रात तिच्याविषयी अनेक 'अफवा' चर्चेत होत्या. एका निर्मात्याला तिच्या पोटावर अंड फ्राय करायचं होतं अशाही अफवा होत्या. मात्र त्या अफवा नसून ते खरं होतं असं मल्लिकानं कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शोमध्ये मान्य केलं. तिनं यामागचा एक किस्साही सांगितला. मी एक गाणं चित्रीत करत होते. त्यावेळी एका निर्मात्यानं ही कल्पना  सुचवली होती असं मल्लिका म्हणाली. त्याच्या मते मी खूपच हॉट दिसत होते, तेव्हा त्यानं कोरिओग्राफरला एक विचित्र कल्पना सुचवली. त्याला  माझ्या पोटावर अंड फ्राय करायचं होतं  तर कंबरेवर पोळ्या शेकायच्या होत्या असं मल्लिका म्हणाली. 

मी अविवाहित पण मला ३ वर्षांची मुलगी, माही गिलचा खुलासा

या अफवा नसून दुर्दैवानं हे खरं होतं. मात्र मी निर्मात्याला असं करू दिलं नाही, असंही मल्लिका म्हणाली. एका मुलाखतीत तिनं अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे २०- ३० चित्रपट गमावल्याचं म्हटलं. माझ्या स्पष्टवक्तेपणाचा आणि मतं मांडण्याच्या स्वभावाची अनेक अभिनेत्यांना भीती वाटायची. हिला चित्रपटात घेऊ नका असे अनेक अभिनेते निर्माता, दिग्दर्शकांना सांगायचे. माझी संधी हिरावून ते आपल्या गर्लफ्रेंड्नां माझ्याजागी काम करण्याची संधी द्यायचे. असे किमान २० ते ३० चित्रपट मी अभिनेते आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले', असं ती म्हणाली.