पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्बल १४ वर्षांनंतर येणार 'नो एण्ट्री २'

नो एण्ट्री २

सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक आणि सीक्वलचा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. येत्या काळात अनेक रिमेक आणि सीक्वल प्रदर्शित होत आहेत. अशातच आता निर्माते बोनी कपूर यांनी 'नो एण्ट्री २' ची घोषणा केली आहे. 

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना हिमेशनं दिलं इतकं मानधन

 'नो एण्ट्री' हा चित्रपट  २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता १४ वर्षे उलटली आहेत. चौदा वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येईन अशी घोषणा बोनी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

काश्मीरवर राज्य करणाऱ्या शेवटच्या हिंदू राणीवर चित्रपट

 'नो एण्ट्री'मध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदिन खान, बिपाशा बासू, लारा दत्ता, ईशा देओल, सेलिना जेटली हे कलाकार होते. हा मल्ट्री स्टारर चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. आता नव्या चित्रपटात कोणाची वर्णी लागतेय हे पाहण्यासारखं ठरेन. 'नो एण्ट्री' हा २००२ साली प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट चार्ली चॅपलिनचा रिमेक आहे.