अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी गेल्यावर्षी याच महिन्यात विवाहगाठ बांधली. राजस्थानमधील आलिशान उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियांका -निकचा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नासाठी निकचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार खास अमेरिका आणि लंडनमधून भारतात आले होते.
Bunty Aur Babli 2 : राणी-अभिषेक नाही तर हे बॉलिवूडचे नवे 'बंटी- बबली'
तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे उमेद भवन पॅलेसला ३ महिन्यांचे उत्पन्न मिळाले. इंडियन हॉटेल्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ पुनीत चट्वालनं टाइम्स नेटवर्क इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्हला उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
'गेल्यावर्षी उमेद भवनमध्ये प्रियांका- निकचा विवाहसोहळा संपन्न झाला. या एका विवाहसोहळ्यामुळे ३ महिन्यांचे उत्पन्न मिळाले. कधीकधी १ टक्का सर्वाधिक खर्चाची क्षमता असलेल्या ग्राहकांचीही मदत होते', असंही पुनीत म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध
काही रिपोर्टनुसार या जोडप्यानं लग्नासाठी सव्वातीन कोटींपेक्षाही अधिक खर्च केला असल्याचं समजत आहे. पारंपरिक भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.