प्रियांका चोप्रा ही 'ग्लोबल स्टार' म्हणून ओळखली जाते. तिनं अनेक बॉलिवूड चित्रपटांसोबतच हॉलिवूडमध्येही आपली नवी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रियांकालाही मानाचं स्थान आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'क्वांटिको' मालिकेनं तर ती अमेरिकेतील घराघरात पोहोचली होती. प्रियांका ही ग्लोबल सोशल मीडिया क्लाइंबर्स चार्टमध्ये गेल्या चार आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे.
जाणून घ्या 'कबीर सिंह', 'आर्टिकल १५', 'सुपर ३०' तिन्ही चित्रपटांची कमाई
तिनं 'द रॉक'लाही याबाबतीत मागे टाकलं आहे. रॉक या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे असं 'द हॉलिवूड रिपोर्टर'नं म्हटलं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूबवर मिळणारे लाइक्स, काँमेटच्या आधारे ही यादी ठरवली जाते. प्रियांकानं ७ जुलैला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडिया क्लाइंबर्सच्या यादीत ती पहिल्या स्थानी आली आहे.
पती निक जोनास सोबत सुट्ट्या व्यतीत करत असताना प्रियांकानं स्विम सुटमधला फोटो शेअर केला होता. या फोटोला २९ लाख ६८ हजारांहून अधिक लाइक्स आहेत. हा फोटो निकनं काढला होता. या फोटोमुळे प्रियांकाला हे अव्वल स्थान मिळाले आहे.