पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नेटफ्लिक्स'च्या सुपरहिरो चित्रपटात प्रियांकाची वर्णी

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही लवकरच नेटफ्लिक्सच्या सुपरहिरो पटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव 'वी कॅन बी हिरोज्' असं असणार आहे. 

या चित्रपटाची कथा रॉबर्ट रोड्रीगूझ यांनी लिहिली आहे. चित्रपटाचं  दिग्दर्शनही तेच करणार आहेत. एलियन्स सुपरहिरोचं अपहरण करतात आणि  या सुपरहिरोंची मुलं आपल्या पालकांना  आणि या जगला वाचवण्यासाठी एकत्र येतात. साधरण या कथेवर 'वी कॅन बी हिरोज्'ची कथा आधारलेली आहे. 

प्रियांकाला कंगनाचा पाठिंबा

या चित्रपटात प्रियांकासोबत अनेक कलाकार दिसणार आहेत. याव्यतिरिक्त प्रियांका 'दी स्काय इज पिंक' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रियांका लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात करणार आहे. 

फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानी