पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियंका चोप्राला व्हायचेय आई; मुलाखतीत केला खुलासा

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

अभिनेत्री प्रियंका चोप्राने अलिकडेच आपल्या वैयक्तीक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रियंकाने एका मुलाखती दरम्यान भविष्यातील आपल्या योजनेविषयी सांगितले. 'आधी सुंदर घर खरेदी करणे आणि आई होणे या आपल्या भविष्यातील योजना आहे', असे प्रियंकाने सांगितले. माझे घर असे असावे ज्याठिकाणी मी ज्यांच्यावर प्रेम करते ती लोकं माझ्याजवळ रहावीत, असे देखील प्रियंका म्हणाली.

प्रियंकाने पुढे असे देखील सांगितले की, 'मी घरासाठी बर्‍याच काळापासून लॉस एंजलिसला एक पर्याय म्हणून पहात आहे. सध्या माझे मुंबई आणि न्यूयॉर्कला घर आहे. मी घरामध्ये स्विमिंग पूल आणि घरामागे बगीचा बनवू इच्छित आहे. जेणेकरुन मला मुंबईची आठवण येत राहिल.' अलीकडेच प्रियांका आणि निक जोनास पीपल्स मॅगझिनच्या यावर्षीच्या बेस्ट ड्रेस सेलिब्रिटींच्या यादीत सहभागी झाले आहेत. ही जोडी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हे पहिल्यांदा झाले आहे की या मॅगझिनने बेस्ट ड्रेससाठी एका जोडीला विजेता घोषित करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

That smile. 😍

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

व्हॅनिटी फेयरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियंकाने तिच्या आयुष्यातील २ अत्यंत मौल्यवान गोष्टी असल्याचे सांगितले. मंगळसूत्र आणि वडील अशोक चोप्रा यांनी तिला दिलेली हिऱ्याची अंगठी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असल्याचे प्रियंकाने सांगितले. माझी सर्वात मौल्यवात गोष्ट मंगळसूत्र आहे. तसंच हिऱ्याची अंगठी माझ्यासाठी खूप खास आहे कारण ती मला माझ्या वडिलांनी दिली असल्याचे प्रियंकानी सांगितले.