पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Frozen 2 : पहिल्यांदाच प्रियांका- परिणीती करणार एकत्र काम

प्रियांका- परिणीती

जंगल बुक, दी लायन किंग, अँग्री बर्ड,  मॅलेफिसन्ट २, डेडपूल यांसारख्या असंख्य परदेशी चित्रपटांना  बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकारांनी  आपला आवाज दिला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 'फ्रोझन २' साठी प्रियांका आणि परिणीती या दोन बहिणी आपला आवाज देणार आहे. 

माझी पत्नी भारतीय आहे, प्रियांकावर निकची स्तुती सुमने

डिझ्नेचा फ्रोझन चित्रपट जगभरातील बच्चेकंपनीमध्ये सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा आता दुसरा  भाग 'फ्रोझन २' देखील येत आहे. भारतात इंग्रजीबरोबर हिंदीतही हा चित्रपट प्रदर्शित होणार असून  या चित्रपटातील इल्सा आणि अ‍ॅना  या दोन मुख्य  भूमिकांना प्रियांका आणि परिणीती आवाज देणार आहेत. 

प्रियांकानं  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी जंगल बुकमधील 'का' या कार्टुन कॅरेक्टरसाठी प्रियांकानं आवाज दिला होता. 

पती निकच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाचा पहिला करवा चौथ

मॅलेफिसन्ट २ साठी ऐश्वर्या राय बच्चननं हिंदीतून आवाज दिलाय. तर दी लायन किंगसाठी शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अब्राहम खाननं आवाज दिला होता.