पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हॉलिवूडमध्ये संधी कशी मिळाली, प्रियांकानं सांगितले त्या दिवसाचे अनुभव

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा हे नाव भारतीयांना नवं नाही. केवळ बॉलिवूड अभिनेत्री इतकीच आपली ओळख मर्यादीत न ठेवता प्रियांका एक ग्लोबल स्टार झाली आहे. 'क्वांटिको' सारख्या मालिकेनं ती जगभरात सर्वाधिक लोकप्रिय झाली. अनेक अमेरिकन चॅट शो, मोठ्या इव्हेंटमध्ये प्रियांकाचा सहभाग असतो. तिनं दोन हॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. लवकरच ती  काही चित्रपटातही दिसणार आहे.  यापूर्वी क्वचितच एका बॉलिवूड अभिनेत्रीला परदेशात करिअर घडवण्यासाठी मोठी संधी मिळाली असेल. 

शाहिदची पत्नी मिरा राजपूत सुरू करणार शाकाहारी रेस्तराँ?

प्रियांकानं हॉलिवूडमध्ये स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. बॉलिवूडमध्ये  आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवल्यानंतर प्रियांकानं आपल्या स्वप्नांच्या कक्षा रुंदावल्या. आज प्रियांका ज्या स्थानी आहे तिथे पोहोचण्याचा प्रवास साहजिकच सोपा नव्हता. यापूर्वी क्वचितच एखादी बॉलिवूड अभिनेत्री तिच्या स्थानी पोहोचली असेल. 

पुण्यात स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून बचावला वरुण धवन

'हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी काम मिळवण्यासाठी नेमकं काय करावं हे मला माहित नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे नेमकी दिशा नव्हती कारण यापूर्वी कोणीही असं केलं नव्हतं. यातून मलाच मार्ग काढायचा होता. मी अनेकांच्या दारी स्वत: जायचे, माझी ओळख करून द्यायचे. माझं नाव प्रियांका चोप्रा आहे. मी भारतीय अभिनेत्री आहे आणि या चित्रपटात मी काम केलं आहे असं सांगत मी अनेकांना स्वत:ची ओळख करुन दिली आहे. मी हॉलिवूडमध्येही अनेकांकडे मुख्य अभिनेत्रीची भूमिका करण्याचं काम मागितलं आहे. अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींना छोटीशी भूमिका दिली जाते, मला हाच पूर्वग्रह तोडायचा होता, म्हणून मी माझ्या मागण्यांवर अडून होती. मला जे हवं होतं त्याबद्दल मला स्पष्टता होती, असं प्रियांका हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या विशेष प्रतिक्रियेत म्हणाली.