पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझी पत्नी भारतीय आहे, प्रियांकावर निकची स्तुती सुमने

प्रियांका चोप्रा- निक जोनास

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं आपला पहिला करवा चौथ परदेशात साजरा केला. प्रियांकाचा पती निक जोनास हा  अमेरिकन गायक आहे. प्रियांकानं निकच्या कॉन्सर्टमध्ये पारंपरिक भारतीय पद्धतीनं करवा चौथ साजरा केला. 

Karwa Chauth 2019 : अनुष्कासाठी विराटनंही केला उपवास

निकनं पारंपरिक पेहरावातील प्रियांकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.  'माझी पत्नी ही भारतीय आहे. ती हिंदू आहे आणि ती सर्वार्थानं अतूल्य आहे. तिनं तिच्या संस्कृती आणि परंपरांबद्दल मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत. तिच्यावर माझं खूप प्रेम आहे.' अशी पोस्ट लिहित निकनं प्रियांकावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

...म्हणून स्वत:च्या लग्नात राधिकानं नेसली आजीची फाटलेली साडी

प्रियांका आणि निक २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले.  राजस्थामधील एका आलिशान हॉटेलमध्ये पारंपरिक भारतीय पद्धतीनं आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सध्या प्रियांका ही निकसोबत अमेरिकेत राहत असून अनेकदा ती भारतातही येते.
नुकताच प्रियांका चोप्राचा 'दी स्काय इज पिंक' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासह फरहान अख्तर, झायरा वसीम यांची प्रमुख भूमिका होती. समिक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभला.