पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका आणि निकनं घेतली 'आर्ची'ची भेट

प्रियांका चोप्रा निक जोनास

प्रियांका चोप्रा जोनास आणि डचेच ऑफ ससेक्स मेगन मार्केल यांची मैत्री ही खूपच खास. प्रियांकाच्या जवळच्या मैत्रीणींपैकी एक मेगन मानली जाते. मेगन गेल्याच वर्षी प्रिन्स हॅरीसोबत विवाहबंधनात अडकली. या शाही विवाहसोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान प्रियांकाला मिळाला.  मात्र प्रियांकाच्या लग्नाला  मेगन काही उपस्थित राहू शकली नाही. 

मेगन आणि प्रिन्स हॅरीनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  या बाळाचं नामकरण आर्ची करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून इव्हेंट,कार्यक्रमात व्यग्र असलेल्या प्रियांकानं नुकतीच तिची सर्वात जवळची मैत्रीण मेगनची भेट घेतली असल्याचं समजत आहे. मेगननं  बाळाला जन्म दिल्यानंतर प्रियांकानं आपल्या सोशल मीडिया  अकाऊंटवरून मेगनला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र वर्षभरातील व्यग्र वेळापत्रकामुळे प्रियांका आणि मेगनची भेट झाली नाही. 

'द सन'च्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक दोघांनीही मेगन आणि बाळ आर्चीची भेट घेतली असल्याचं म्हटलं आहे. मेगनच्या बाळासाठी प्रियांकानं एका आलिशान ज्वेलरी शॉपमधून महागडी भेटवस्तू घेतल्याचंही द सननं म्हटलं आहे.