पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परदेशात असलेल्या प्रियांकानं मानले भारतातल्या त्या देवदूतांचे आभार

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अमेरिकेत वास्तव्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकाला आपल्या घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत येऊन आपल्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या हजारो देवदूतांचे म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्याची विनंती केली होती. प्रियांका सध्या अमेरिकेत असली तरी तिनं आपल्या लॉस एंजलिसमधील घरातून बाहेर येत सर्वांचे आभार मानले आहेत. तिनं  याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

कनिकानं 'नखरे' करणं बंद करावं, रुग्णालय प्रशासनानं फटकारले

'आज प्रत्येक भारतीय कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत आहेत, मी जरी त्यांचे आभार मानण्यासाठी प्रत्यक्ष भारतात नसले तरी, मी माझ्या मनानं आणि आत्म्यानं तिथेच आहे', असं प्रियांकानं म्हटलं आहे. 

सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटी,  सामान्य नागरिकांनी आपल्या खिडक्या, बालकनीमध्ये उभे राहून अहोरात्र मेहनत करणाऱ्या या प्रत्येकांचे टाळ्या किंवा थाळ्या वाजवून  आभार मानले होते. 

PHOTOS : 'गुलाबी शहरा'त नेहा