गेल्याच आठवड्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिनं तिचा ३७ वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच वाढदिवस होता त्यामुळे निकनं या सोहळ्यात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. प्रियांकाच्या वाढदिवस सोहळ्यात तिच्यासाठी आणलेला पाच थरांचा केक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. हा केक प्रियांकानं परिधान केलेल्या आऊटफिटला अगदी साजेसा होता.
'बिग बॉस'च्या घरात परतण्याबाबत शेफ परागचा खुलासा
या केकची किंमत लाखोंच्या घरात होती. पिंक व्हिलाच्या माहितीनुसार या पाच थरांच्या केकची किंमत ३. ४५ लाख इतकी होती. चॉकलेट, व्हॅनिला फ्लेवर्सच्या या केकमध्ये एडिबल गोल्डदेखील होतं. प्रियांकाच्या किरमिजी, लाल रंगाच्या ग्लिटर आउटफिटला हा केक अगदी साजेसा होता. प्रसिद्ध केक मेकर्स डिव्हाइन डेलिकसी केक कंपनीनं हा केक तयार केला होता.
प्रियांकानं मिआमीमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रियांसोबत तिची आई आणि परिणिती चोप्रादेखील होती.