पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वॉर' आणि 'जोकर' प्रियांकाच्या 'दी स्काय इज पिंक'वर पडले भारी

बॉक्स ऑफिस कलेक्शन

प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम दिग्दर्शित 'दी स्काय इज पिंक' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. समीक्षकांकडून प्रशंसा मिळूनही प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाकडे पाठ फिरवली असंच दिसतंय. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात १० कोटींची कमाई केली आहे.

'वॉर'नंतर 'क्रिश ४' साठी हृतिक तयार

'दी स्काय इज पिंक'वर हॉलिवूड चित्रपट 'जोकर' आणि हृतिक- टायगरचा 'वॉर' भारी  पडल्याचं म्हटलं जात आहे. हे दोन्ही चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित झाले. हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं  २५७ कोटींची कमाई केली. तर 'जोकर'नं ४९ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांची पसंती ही 'वॉर' आणि 'जोकर'ला अधिक मिळालेली दिसून येत आहे याच कारणामुळे 'दी स्काय इज पिंक'वर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 

दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स

खूप लहान वयात जगाचा निरोप घेणारी प्रभावी वक्ता आयशा शर्मा हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सोनाली बोसनं केलं आहे. भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो 'टोरेंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट संपल्यानंतर सर्व मंडळीनं उभं राहून टाळ्यांच्या गडगडात चित्रपटाची प्रशंसा केली. मात्र भारतीय प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवल्याचंच दिसून येतंय. 

झी मराठी अवॉर्ड्स : या मालिकेनं यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मारली बाजी