पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

The Sky Is Pink Trailer : मुलीच्या नजरेतून आई- वडिलांच्या 'प्रेमाची गोष्ट'

दी स्काय इज पिंक

 प्रियांका चोप्रा, झायरा वसिम, फरहान अख्तर यांची प्रमुख भूमिका असलेला 'दी स्काय इज पिंक'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर प्रियांका हिंदी चित्रपटात दिसत आहे तर अभिनेत्री झायरा वसिमचा हा शेवटचा चित्रपट आहे. दोन चित्रपटात काम केलेल्या झायरानं नुकतीच बॉलिवूडमधून आपली निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही कारणांमुळे  'दी स्काय इज पिंक' हा प्रेक्षकांसाठी खास होता. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.

'मोगुल'साठी आमिरचा पुन्हा होकार, गुलशन कुमार यांच्या भूमिकेत

हा चित्रपट प्रेरणादायी वक्ता आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे. आजारपणामुळे वयाच्या १८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या आयशाभोवती 'दी स्काय इज पिंक'ची कथा फिरते. आयशाच्या नजरेतून तिची आई- वडिलांची कथा या चित्रपटात दाखवली आहे. झायरा वसिमनं या चित्रपटात आयशाची भूमिका साकारली आहे तर फरहान- प्रियांका तिच्या पालकांच्या भूमिकेत आहे. सोनाली बोसनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ हा नवा चित्रपट

भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 'द टोरँटो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये तो दाखवण्यात येणार आहे. १३ सप्टेंबरला तो या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येईल.