पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेघरांसाठी प्रार्थना करा, दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता

 दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास सध्या राजधानी दिल्लीत आहेत. प्रियांकानं दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त करणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर लिहिली आहे. इथल्या वातावरणात राहणं खूपच अवघड आहे. अशा परिस्थितीत इथे राहण्याची मी कल्पनाही करु शकत नाही. सर्वांनी सुरक्षित राहा जे बेघर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी पोस्ट प्रियांकानं  लिहिली आहे.

प्रदूषणापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता हा उपाय

प्रियांका नेटफ्लिक्सच्या 'द व्हाइट टायगर' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रियांका दिल्लीत आली आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. इथे आरोग्यविषयक आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. शाळांनादेखील मंगळवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. 

दिल्लीत आल्यानंतर प्रियांकानं दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. इथे चित्रीकरण करणं खूपच अवघड जात आहे. अशा परिस्थितीत इथे राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्यूरिफायर आणि मास्क मिळण्याइतकी मी नशिबवान आहे. प्रत्येकानं सुरक्षित राहा इथल्या बेघरांसाठी प्रार्थना करा कशी पोस्ट प्रियांकानं लिहिली आहे. 

दिल्लीत आजपासून 'सम-विषम' लागू, उल्लंघन केल्यास ४ हजारांचा दंड