अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं आपला पहिला करवा चौथ साजरा केला. प्रियांकाचा पती निक हा अमेरिकन गायक आहे. गेल्या काही महिन्यांपासून निक आणि जोनास ब्रदर्सचे देशातल्या विविध शहरात म्युझिक कॉन्सर्ट आहेत. प्रियांका अनेकदा या कॉन्सर्टमध्ये आवर्जून सहभागी होते. निकच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक पूर्वनियोजीत असल्यानं प्रियांकानं आपला पहिला करवा चौथ म्युझिक कॉन्सर्टमध्येच साजरा केला.
टीआरपीच्या यादीत वादग्रस्त 'बिग बॉस १३' पडला मागे
लाल रंगाची साडी, लाल चूडा, सिंदूर, हातावर मेहंदी असा श्रृगांर केलेली प्रियांका खऱ्या अर्थानं 'देसी गर्ल' दिसत होती. आठवणीत राहिल असा करवा चौथ अशी ओळ प्रियांकानं लिहित पती निकसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये प्रियांका-निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकली. प्रियांका सध्या पती निकसोबत अमेरिकेत राहत आहे.