पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका आणि निकचा नव्या घरासाठी शोध

प्रियांका चोप्रा- निक जोनास

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकले. प्रियांका ही सध्या निकसोबत अमेरिकेत राहत आहे. या दोघांनी आता नव्या घरासाठी शोध सुरू केला आहे. 

सेटवर येऊन दिले होते आशीर्वाद, रितेशनं सांगितली सुषमा स्वराज यांची आठवण

निकनं २०१८ साली बेव्हर्ली हिल्स परिसरात आलिशान घर खरेदी केलं होतं. हॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींची घरं याच परिसरात आहेत. मात्र निकनं हे घर विकलं आहे. या घराची किंमत जवळपास ४८ कोटींहून अधिक असल्याचं समजत आहे. निकच्या ५ बेडरुमच्या या आलिशान घराची चर्चा सोशल मीडियावर खूपच रंगली होती. निकनं प्रियांकासाठी  भेट म्हणून हे घर खरेदी केल्याचं म्हटलं जात होतं. 

या मराठी कलाकाराच्या अभिनयानं प्रभावित झाली परिणीती चोप्रा

आता ते दोघंही नव्या घराच्या  शोधात आहेत. निक आणि प्रियांकाच्या नव्या घरासाठीचं बजेट हे १०० कोटींहून अधिक असल्याचं समजत आहे.