पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रिया म्हणते, वेबसीरिजच्या निमित्तानं ते दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले

प्रिया उमेश कामथ

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची  'आणि काय हवं' ही नवी कोरी मराठी वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश तब्बल सात वर्षांनी एकत्र काम करत आहेत. 

वेबसीरिजच्या अनुभवाबद्दल प्रिया म्हणते, की 'या वेबसीरिजची टीम मला माझ्या कुटुंबासारखी वाटते. तसेच या वेबसीरिजमध्ये लग्न झालेलं जोडपं आहे. जे  त्यांच्या लग्नानंतरचे काही सुंदर क्षण पहिल्यांदा अनुभवताना दिसत  आहेत. मुख्य म्हणजे उमेशसोबत खूप वर्षांनी काम करण्याचा अनुभव चांगलाच होता आणि त्यात लग्नानंतरच्या आमच्यासुद्धा काही आठवणी आहेत, त्या आठवणी या वेबसीरिजमुळे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या' असं प्रिया म्हणाली.  'आणि काय हवं'  या वेबसीरिजमध्ये लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यांमध्ये घडणारे अमुल्य आणि तितकेच महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले  आहेत.

'प्रिया आणि मी सात वर्षांनंतर एकत्र झळकलो. आम्हाला एकत्र काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि या क्षणाची खरंतर आम्ही आतुरतेनं वाट पाहात होतो. दरम्यानच्या काळात आम्हाला 'आणि काय हवं'बद्दल विचारणा करण्यात आली. आम्हाला ही संकल्पनाच इतकी आवडली, की आम्ही चटकन होकार दिला. यात लग्नानंतर घडणाऱ्या अनेक छोट्या तरीही मौल्यवान गोष्टी खूपच सुंदररित्या दाखवण्यात आल्या आहेत आणि मुळात हा तुम्हा-आम्हा सगळ्यांचाच अनुभव आहे त्यामुळे ही वेबसीरिज तुम्हाला खूपच जवळची वाटेन.' असं उमेश म्हणाला.