पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी झाली प्रिया- उमेशची पहिली 'भेट'

प्रिया बापट उमेश कामथ

प्रिया बापट आणि उमेश कामथ मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचं आवडतं जोडपं होय. प्रिया आणि  उमेश दोघंही एकाच क्षेत्रातले मात्र दोघांचे स्वभाव, आवडनिवड, कामची पद्धत सारं काही वेगळंच. दोघांचं व्यक्तिमत्त्व हे पूर्णपणे वेगळं असलं तरी प्रेमाच्या नाजूक धाग्यानं ही जोडी १४ वर्षे एकमेकांना बांधली  गेली. हिंदुस्थान टाइम्स पुणेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं या जोडीशी आम्ही  संवाद साधला आणि त्यांची पहिली भेट उलगड्याचा प्रयत्न केला. 

' चंद्रकांत कुलकर्णींच्या भेट चित्रपटाच्या प्रिमियरला माझी आणि उमेशची पहिल्यांदा भेट झाली. मी त्यापूर्वी कधीही सेटवर  उमेशला भेटले नव्हते. उमेश मला म्हणाला होता की मी त्याला खूपच अॅटीट्यूड असणारी मुलगी वाटली. त्याला माझा तो स्वभाव खटकला होता. पण  काहीही असो त्यानं मला पाहिलं होतं प्रिया सांगत होती. ती एक तोंडओळख होती ती म्हणाली. 

मुस्लिम सून चालते पण जावई नको, सुनैनाच्या प्रियकराचा सवाल

'खरं सांगायचं तर मी आभाळमाया मालिकेच्या सेटवर त्याला भेटले. मी त्याच्या कामानं प्रभावित झाले होते आम्ही दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा भेटलो', असं प्रियानं सांगितलं. 

मात्र उमेशकडे त्याच्या प्रेमकहाणीबद्दल सांगण्यासारखी थोडी वेगळी गोष्ट होती. आभाळमायाच्या सेटवर आम्ही दोघांचे फोन नंबर  घेतले. मात्र त्यानंतर खूप वर्षांनंतर आम्ही एकमेकांशी बोलायला खऱ्या अर्थानं सुरूवात केली. कॉलेज प्रोजेक्टसाठी माझी मुलाखत हवी आहे असा बहाणा तिनं केला. आम्ही वरळी सी फेसला भेटलो. तिच्याजवळ लिहिण्यासाठी वही होती मात्र ती त्यात काहीच लिहित नव्हती. तिला मी आवडतो हे तेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं, उमेशनं सांगितलं. 

सलमानला पहिला चित्रपट माझ्यामुळे मिळाला- जॅकी श्रॉफ

त्या भेटीनंतर आम्ही चॅटींग करायला सुरूवात केली. आम्ही रात्रभर बोलायला लागलो असं सांगत उमेशनं त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी जागवल्या.