पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Prithviraj : अक्षय साकारणार राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

पृथ्वीराज

अभिनेता अक्षय कुमारनं  आपल्या ५२ व्या वाढदिवशी शूर योद्धा आणि राजा पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. 'पृथ्वीराज' असं चित्रपटाचं नाव असून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या २.० चित्रपटाने केली ९.५ कोटींची कमाई

'वाढदिवशी माझ्या पहिल्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. शूर योद्धा, सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणं हे मी भाग्य समजतो. हा माझा सर्वात मोठा चित्रपट आहे', असं अक्षय कुमार म्हणाला. यशराज फिल्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. २०२० साली दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी प्रसिद्ध मालिका 'चाणक्य'चं दिग्दर्शन केलं आहे. 'पिंजार' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. 

वीणाने दिलेले बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क

'या चित्रपटात काम करणं हे मी माझं भाग्य समजतो. आपल्या इतिहासातील शूर योद्धे, महान राजे यांची शौर्यगाथा आपण चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणलीच पाहिजे, असं अक्षय हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाला.