पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयच्या पत्नीबद्दल मोदी म्हणतात...

पंतप्रधान मोदी मुलाखत

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक राजकिय नेते मुलाखतीद्वारे  आपलं मत व्यक्त करत आहेत. मात्र राजकारणापलीकडे जाऊन पंतप्रधान मोदींची हलकी फुलकी मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली. या मुलाखतीची सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगत आहे. अक्षयच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या मोदींनी अक्षयला पत्नी ट्विंकलवरून मिश्किल प्रतिक्रिया  दिली. 

'मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे,’ अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली.‘सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय असता. अनेकजण तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न विचारत असतात. तुम्ही स्वत: त्याकडे लक्ष देता का,’ असा प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर मोदींनी गंमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे. 

अक्षयनं घेतलेल्या मोदींच्या  मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ ट्विंकलनं आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. 'मी या सर्व गोष्टींकडे खूपच सकारात्मरित्या पाहते. पंतप्रधानांना माझ्याबद्दल माहिती आहे पण त्याचबरोबर त्यांनी माझी पुस्तक वाचली आहेत हे ऐकून खूपच आनंद झाला', अशा शब्दात ट्विंकलनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर दरदिवशी व्हायरल होणाऱ्या मीम्सवरही मोदींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मीम्स तयार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या कल्पक बुद्धीचं मला फारच कौतुक वाटतं असं ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Prime Minister aware that I exist but he actually reads my work Twinkle Khanna on akshay kumar interview