पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दबंग ३' मध्ये प्रितीही झळकणार?

दबंग ३

सलमान खानचा 'दबंग-३' डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सईही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटाही दिसणार अशीही  चर्चा आहे. 

VIDEO : तब्बल १३ वेळेस संगीतबद्ध केलं 'गर्ल्स'मधलं पहिलं गाणं

प्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेता सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुनच 'दबंग-३'मध्ये प्रिती झिंटा लेडी पोलिसांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Halloween everyone 😘 @beingsalmankhan #chulbulpandey #halloween #fun #madness #ting

A post shared by Preity G Zinta (@realpz) on

प्रितीनं पोलिसांच्या वेशातला फोटो शेअर केला आहे. हा फोटो  पाहून आता ती 'दबंग-३' मध्ये दिसणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

प्रिती आणि सलमान खान ही एकेकाळची बॉलिवूडमधली हिट जोडी होती. प्रितीनं सलमानसोबत 'चोरी चोरी चुपके चुपके',  'जान- ए- मन', 'हर दिल जो प्यार करेगा', 'दिल ने जिसे अपना कहा ' यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे जर प्रिती दबंग ३' मध्ये दिसली तर बऱ्याच वर्षांनी या जोडीला छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा  योग येणार आहे. 

'गुलाबो सिताबो' वेळेआधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला