पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'

प्रसाद ओक

'शिवकालीन इतिहासातील एका महत्त्वाच्या कथेवर मराठी चित्रपट येतोय आणि या चित्रपटासाठी  राज्यात चित्रपटगृहच उपलब्ध नाही यापेक्षा दुर्दैव ते काय', अशा शब्दात 'हिरकणी' चित्रपटाचे  दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मराठी हिंदुस्थान  टाइम्सशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. 

तुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा

 'हिरकणी' आणि 'ट्रिपल सीट' मराठीतले दोन मोठे चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहेत. मात्र 'हाऊसफुल ४' मुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवलेल्या शूर आई हिरकणीवर 'हिरकणी' हा चित्रपट येत आहे. तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. मात्र महाराष्ट्रातच या चित्रपटासाठी स्क्रीन उपलब्ध होत नाही. 

'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'

'दक्षिणेत प्राधान्य हे दाक्षिणात्य चित्रपटांना असतं. मग महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची ही अवस्था  का? असा संतापजनक सवाल प्रसाद ओक यांनी विचारला आहे. हे काही पहिल्यांदाच होत नाही, यापूर्वी अनेकदा हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहच उपलब्ध झाली नाही. कित्येक मोठ्या  दिग्दर्शकांनी सरकार दरबारी आपली समस्या मांडली'. हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला. मात्र सरकार यावर काहीच करत नाही ही खेदजनक बाब असल्याचंही प्रसाद ओक म्हणाले.