पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयसोबत टक्कर टाळण्यासाठी 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार?

साहो

 येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर तीन  मोठ्या स्टार्सची  टक्कर पाहायला मिळणार आहे. यादिवशी  अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', जॉन  अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि  प्रभासचा  बिग बजेट 'साहो' प्रदर्शित होत आहे. मात्र आता काही रिपोर्टनुसार प्रभासच्या 'साहो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. 

'डान्स इंडिया डान्स'च्या प्रत्येक एपिसोडसाठी करिनाला सर्वाधिक मानधन?

'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'दी इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार 'साहो' च्या प्रदर्शनाची तारीख बदलून ती ३० ऑगस्ट करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', जॉन  अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे दोन्ही चित्रपट  सत्य घटनेपासून प्रेरित आहेत. 'मिशन मंगल'मध्ये अक्षयसह विद्या बालन, शरमन जोशी, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. बॉक्स ऑफिसवर जॉन  अब्राहम आणि अक्षयची टक्कर ही अटळ आहे. 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' एकाच दिवशी प्रदर्शित करण्यास अक्षय आणि जॉन दोघांची हरकत नाही. 

शाहरुखचा तो निर्णय योग्यच, अनुपम खेर यांचं समर्थन

पण प्रभासच्या बिग बजेट 'साहो' ची तारीख मात्र पुढे जाणार आहे.  तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणाम होऊन नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.