पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय-प्रभास टक्कर टळली, 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

अक्षय कुमार- प्रभास

पुढील महिन्यात तीन महत्त्वाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहेत. यात अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', जॉन  अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि  प्रभासचा  बिग बजेट 'साहो' या चित्रपटाचा समावेश आहे. हे तिन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होते. मात्र आता दोन मोठ्या चित्रपटांसोबत टक्कर टाळण्यासाठी प्रभास- श्रद्धाच्या 'साहो' चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. हा चित्रपट आता ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार आता प्रभास- श्रद्धाचा 'साहो' ऑगस्टच्या अखेरीसच प्रदर्शित होणार आहे. 'साहो' चित्रपट हा सर्वात बिग बजेट असा चित्रपट आहे. तो तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील सर्वाधिक बजेट हे साहसी दृश्यांवर खर्च करण्यात आलं आहे. या चित्रपटातील ८ मिनिटांच्या एका दृश्यासाठी जवळपास ७० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती डीएनए या वृत्तपत्रानं सुत्राच्या हवाल्यानं दिली आहे. 

'मिशन मंगल', 'बाटला हाऊस' आणि 'साहो' हे तिन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं चित्रपटाच्या कमाईवरही याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच कदाचित 'साहो' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असं म्हटलं जात आहे. तुर्त तरी अक्षय-प्रभास या दोघांची बॉक्स ऑफिसवरील टक्कर टळली असली तरी  अक्षय आणि जॉनची टक्कर मात्र अटळ आहे.