पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रभासची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट

प्रभास

प्रभासचा बहुचर्चित असा 'साहो' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य कलाकारांबरोबर बॉलिवूडमधले अनेक चेहरे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 'साहो' प्रदर्शित होऊन आठवडा उलटल्यानंतर या चित्रपटातील मुख्य अभिनेता प्रभासनं चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

...म्हणून वहिदा रहमान आहेत बिग बींचं प्रेरणास्थान

'माझे सर्व चाहते आणि  प्रेक्षकांचे मनापासून आभार. साहो चित्रपटावर तुम्ही खूप प्रेम केलं. या चित्रपटानं जे यश मिळवलं ते केवळ तुमच्यामुळेच शक्य झालं आहे', असं प्रभासनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटानं भारतासह जगभरात एकूण ३५० कोटींची कमाई केली अशी माहितीही प्रभासनं दिली.

 प्रभास आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा एकूण ३५० कोटींचा आहे. त्यामुळे नफा कमावण्यासाठी चित्रपटानं त्याहून अधिक कमाई करणं अपेक्षित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. 

रानू मंडलचं गाणं ऐकून लता मंगेशकर म्हणतात....