पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रभास म्हणाला, रविना माझी एक्स गर्लफ्रेंण्ड

प्रभास -रविना

प्रभास आणि श्रद्धा कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतेच या जोडीने 'नच बलिए' कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात प्रभास-रविना यांच्यातील कमालीची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात रविनाविषयी प्रभासने केलेल्या एका वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.   

या कार्यक्रमाचा एक प्रमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यक्रमाच्या पर्यवेक्षणाची धूरा सांभाळणारे अहमद म्हणतात की, प्रभास या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका तरुणीचा सर्वात मोठा चाहता आहे. प्रभास रविना आपली एक्स गर्लफ्रेंड असल्याचे सांगतो. त्यानंतर रविनाच्या 'मोहरा' चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या टिप-टिप बरसा पानी.. या गाण्यावर प्रभास तिच्यासोबत ठुमकेही लगावताना पाहायला मिळते.  
 
३० ऑगस्टला प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच साहोनं तेलगू बहूल राज्यात अनपेक्षितरित्या चांगली कमाई केली आहे. तेलगू राज्यातील कामाई ही जवळपास २०० कोटींच्या घरात जाईल, अशी माहिती व्यापार विश्लेषक त्रिनाथ यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिली होती.