पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

समलैंगिक असल्याचं जाहीरपणे कबुल करणाऱ्या दुतीचं एलेन डीजेनेरेसकडून कौतुक

दुती आणि ऐलेन

होय, मी समलैंगिक आहे असं जाहीरपणे कबुल करणाऱ्या  धावपटू दुती चंदचं प्रसिद्ध टीव्ही शो  होस्ट एलेन डीजेनेरेसनं कौतुक केलं आहे.  भारतात अजूनही काही ठिकाणी खुलेपणानं  समलैंगिकसंबधांना मान्यता दिलेली नाही मात्र तरीही दुतीनं जाहीरपणे आपण  समलैंगिक असल्याचं कबुल केलं तिच्या या धाडसाचं एलेननं कौतुक  केलं आहे. 

भारतीय खेळाडुंपैकी समलैंगिक संबधांविषयी बोलणारी ती पहिली खेळाडू आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो असं लिहित एलेननं दुतीचं कौतुक केलं आहे. एलेन ही जगभरात  ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींपैकी  एक आहे.  दुतीनं दाखवलेल्या धाडसाची तिनं दखल घेतली आहे. 

दुती भारताची स्टार धावपटू आहे तसेच १०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रमही तिनं रचला आहे. आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या दुतीने आपल्याच शहरातील एका महिलेबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केलं. मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर मला माझ्या संबंधांबाबत खुलेपणाने बोलण्याचा विश्वास प्राप्त झाला, असे दुतीने म्हटले. एक खेळाडू म्हणून कोणालाही माझ्याबाबत मत बनवण्याचा अधिकार नाही. कारण हा माझा निर्णय आहे त्याचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे, असेही ती म्हणाली.


 सर्वांसमोर येऊन आपले नाते उघड करण्याची गरज का वाटली यावरही दुतीनं स्पष्टीकरण दिलं आहे. माझी सख्खी बहिण मला ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. एवढेच नाही तर तिने मारहाण देखील केली, अशी माहिती दुती चंदनं एएनआयशी बोलताना दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:popular TV personality Ellen DeGeneres proud of India Dutee Chand for open up about Same sex Relationship