पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉमेडियन वेणू माधव यांचे ३९ व्या वर्षी निधन

वेणू माधव

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आणि कॉमेडियन वेणू माधव यांचे निधन झाले आहे. ३९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लिव्हर आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. सिकंदराबाद येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

बॉलिवूडच्या 'सुलतान'ला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

माधव वेणू यांचे जवळचे मित्र आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द पीआर वामसी काका यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून वेणू यांना श्रध्दांजली वाहिली आहे. वेणू माधव यांच्या निधनाची माहिती कळताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच त्यांचे चाहते देखील दु:खी झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वेणू माधव यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 

फाळके पुरस्काराच्या घोषणेनंतर महानायकाने 'असे' मानले आभार

वेणू माधव यांनी आतापर्यंत १५० पेक्षा जास्त तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या नालागोंडा जिल्ह्यातील कोडड गावामध्ये झाला होता. त्यांनी १९९७ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. संप्रदायम आणि मास्टर या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती. 'हंगामा', 'भूकैलास', 'प्रेमाभिशेकम' या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली होती. 

'हाऊसफुल ४'चे पोस्टर रिलीज; असा आहे अक्षय, रितेश आणि बॉबीचा फर्स्ट लूक