पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षांत गश्मीर- पूजाचा 'बोनस'

बोनस मराठी चित्रपट

मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बोनस' चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या आज प्रकाशित झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाकडून काय अपेक्षित केले जाऊ शकते, याचा आडाखा बांधता येतो. हा चित्रपट रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. हे दोघेही या पार्श्वभूमीवर अगदी रोमँटीक अशा पोजमध्ये उभे आहेत. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याशिवाय अत्यंत ग्लॅमरस अशी गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्यानेही या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

''जेएनयूत जे काही घडलं त्याची मला चीड आली''

गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे टीकेट' आणि 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' यांसारखे त्याचे चित्रपटात तो दिसला . तर  पूजा सावंतनं  'दगडी चाळ', 'वृदांवन', 'पोश्टरबॉइज', 'लपाछपी', 'जंगली' या चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्मात केली आहे.

'बोनस' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यात 'हापूस', 'ताऱ्यांचे बेट', 'हृदयांतर', 'चुंबक' आदी चित्रपटांचा समावेश आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.

...म्हणून एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचा नेहा- शार्दुलचा निर्णय