पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पूजा- गश्मीरच्या ‘बोनस’चा ट्रेलर पाहिलात का?

बोनस

पूजा सावंत- गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘बोनस’चा ट्रेलर मंगळवारी लाँच करण्यात आला. ट्रेलर प्रकाशनाच्या या शानदार समारंभाला चित्रपटातील कलाकार गश्मीर महाजनी, पूजा सावंत, मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर, दिग्दर्शक सौरभ आर भावे आणि प्रस्तुतकर्ता तसेच निर्माते हजर होते.

अभिनेता शहबाज खानविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल

 या चित्रपटाची कथा एका सुखवस्तू कुटुंबातील युवकाभोवती फिरते. तो एका सर्वसामान्य मजुराप्रमाणे एक महिना आयुष्य व्यतीत करण्याचे आपल्या आजोबांचे आव्हान स्वीकारतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. या युवकाने त्याच्या आजोबांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या निर्णयावर टीका केलेली असते, त्यातून हे आव्हान आजोबा त्याला देतात. आठ हजार रुपयांमध्ये महिना काढण्याचे आव्हान तो स्वीकारतो. तो एका कोळीवाड्यात ८० चौरस फुटांच्या झोपडीत राहतो. त्यादरम्यान त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण होते.

‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे,’ अशी टॅगलाईन त्याच्या या ट्रेलरवर अवतरते. त्यातून ही कथा पुढे सरकते आणि शेवटी एक सामाजिक संदेश देत संपते. त्या कोळीवाड्यातच तो त्याच्या प्रेयसीला भेटतो. तिची भूमिका पूजा सावंतने साकारली आहे. नायक आपले आव्हान पूर्ण करतो की त्यात त्याला हार मानवी लागते? त्याच्या प्रेमकथेचा शेवट गोड होतो? त्याच्या प्रेयसीच्या युक्तीवादाला तो योग्य उत्तरे देतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

सेटवरील व्यक्तीच्या निधनानंतर अपूर्वाचं आर्थिक मदतीसाठी आवाहन

या चित्रपटाची सध्या अख्ख्या चित्रपटसृष्टीत चर्चा आहे, ती विविध कारणांसाठी. या चित्रपटाची कथा तर अनोखी आहेच, पण पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. गश्मीर आणि पूजा यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने चित्रपट रसिकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. ‘बुडायची भीतीच माणसाला पोहायला शिकवते’ ही टॅगलाईन गश्मीरच्या पोस्टरवर आहे. त्यातून हा युवक एका आव्हानाचा सामना करतो आहे, ही बाब व्यतीत होते. 

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

मोठ्या विश्रांतीनंतर शाहरूख बॉलिवूडमध्ये येण्यासाठी पुन्हा सज्ज