पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पूजाची एक झलक पाहण्यासाठी त्यानं पाच दिवस रस्त्यावर काढले

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )

काही चाहत्यांसाठी त्यांचे आवडते कलाकार हे  अगदी उच्च स्थानी असतात. रजनिकांत, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांच्या घराबाहेर  चाहत्यांची अनेकदा गर्दी पाहायला मिळते. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी तासन् तास चाहत्यांनी कलाकरांच्या घराबाहेर  गर्दी केल्याची उदाहरणं काही नवी नाही.  अभिनेत्री पूजा हेगडेलाही असाच काहीसा अनुभव आला. पूजाची एक झलक  पाहण्यासाठी तिचा निस्सिम  चाहता चक्क पाच दिवस तिच्या घराबाहेर होता, इतंकच नाही तर तिला भेटण्यासाठी त्यानं पाच रात्री रस्त्यावरच घालवल्या.

Video : 'मिस यु मिस' चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

पूजाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिनं चाहत्याची माफी मागितली तसेच त्याचा व्हिडिओ तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअरही केला. तिच्यासाठी  या चाहत्याला त्रासातून जावे लागले, यासाठी पूजानं त्याची मनापासून माफी मागितली. पूजानं त्याची भेट घेतली तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. 

भास्कर राव असं तिच्या चाहत्याचं नाव असून तिला भेटण्यासाठी तो  मुंबईत आला होता. मात्र पूजाची भेट घडू न शकल्यानं त्यानं रस्त्यावरच  रात्र काढली. 'महेंजो दारो' चित्रपटातून पूजानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतीच ती 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटात दिसली. लवकरच ती 'जान' या दाक्षिणात्य चित्रपटात सुपरस्टार प्रभास सोबत दिसणार आहे. 

राज्यातही होणार 'तान्हाजी' करमुक्त, लवकरच घोषणा