पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूजा भट म्हणते, ...म्हणून मी कधीच CAA-NRCला पाठिंबा देणार नाही

पूजा भट

अभिनेत्री पूजा भट हिने आपण कधीच सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) याला पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना तिने उघडपणे या कायद्याविरोधातील आपली भूमिका मांडली.

CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार

पूजा भटने म्हटले आहे की, मतभेद असणे हा सुद्धा देशभक्तीचाच एक प्रकार आहे. सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विषयावरून विविध ठिकाणी विद्यार्थी जे आंदोलन करताहेत त्यामुळे देशातील सत्ताधारी पक्षाविरोधात सर्वजण एकत्र झाल्याचाच संदेश गेला आहे. आपल्या शांततेमुळे आपल्याला काही मिळणार नाही. पण त्याचवेळी सरकारची शांतताही त्यांना वाचवू शकणार नाही. आज सत्ताधाऱ्यांमुळेच आपण सर्व एकत्र आलो आहोत. आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे हाच संदेश विद्यार्थी देताहेत. जोपर्यंत आमचे म्हणणे नीटपणे ऐकले जात नाही. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. मतभेद असणे हा सुद्धा देशभक्तीचाच एक प्रकार आहे, असे तिने या कार्यक्रमात सांगितले.

खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या 'हॅपी पीएचडी'ची लाहोरमध्ये हत्या

वी द पीपल ऑफ महाराष्ट्र आणि परचम फाऊंडेशन या संघटनांनी संयुक्तपणे दक्षिण मुंबईत कुलाब्याला हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आयोजकांनी आणि वक्त्यांनी मिळून एक ठरावही मंजूर केला. या ठरावामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याबद्दल शासनाची भूमिका काय आहे, हे ३० दिवसांत स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.