पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहिणीला पाठिंबा देणाऱ्या कंगनाविरोधात पोलिसात तक्रार

कंगना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. बहीण रंगोली चंडेल हिला समर्थन  दिल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रंगोली चंडेल हिच्या ट्विटर अकाऊंटवर काही  दिवसांपूर्वी कारवाई करत ते बंद करण्यात आलं होतं. रंगोलीचे ट्विट हे द्वेष पसरवणारे  होते असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला. 

बाळाला घरमालकाकडे सोडून डॉक्टर पती-पत्नीकडून कोरोनाबाधितांवर उपचार

मुंबईस्थित वकील अली खाशिफ खान देशमुख यांनी रंगोलीला समर्थन देणाऱ्या कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'एक बहिणी द्वेष पसरवते तर दुसरी तिच्या समर्थनार्थ पुढे येते, अशी टीका वकील अली यांनी केली आहे. 'स्वत:च्या फायद्यासाठी ती स्टारडम, पैसा, प्रसिद्धी, ताकद आणि प्रभावाचा वापर करत आहे', असाही आरोप अली यांनी केला आहे. 

अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटाच्या यशानंतर 'रेड २' ही येणार

कंगनानं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यावरुन ती वादात सापडली आहे. माझ्या बहिणीनं जर वादग्रस्त ट्विट केले असतील आणि कोणीही त्या ट्विटचा पुरावा दिला तर आम्ही दोघीही सर्वांची माफी मागू असं म्हणत कंगनानं बहीण रंगोलीची बाजू घेतली आहे.