पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: रणवीर-दीपिकाकडून पीएम केअर्स फंडासाठी मदत

रणबीर- दीपिका

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना पीएम केअर्स फंडासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या आवाहनानंतर अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करत अनेक कलाकारांनी आपल्यापरीने शक्य होईल तितकी मदत केली. आता बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोनने मदतीचा हात पुढे केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

🙏🏽

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

डिसेंबरच्या या तारखेला रणबीर -आलिया अडकणार विवाहबंधनात?

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोनने पीएम केअर्स फंडासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र दोघांनीही मदत निधीचा आकडा जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'सद्य परिस्थितीतही छोटा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आम्ही नम्रतेने पीएम-केअर्स फंडामध्ये योगदान देण्याचे वचन देतो आणि आपणही यात योगदान द्याल अशी आशा आहे. संकटाच्या या प्रसंगी आपण सर्वजण एकत्र आहोत.', असे दोघांनी सांगितले. 

तापसी म्हणजे ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट, कंगनाच्या बहिणीच्या पुन्हा 'पंगा'

रणवीर-दीपिकाने पीएम केअर्स फंडाला मदत दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी दोघांचे कौतुक केले. तर, कोरोनाविरोधातील लढाईसाठी अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत केली. तसंच, ऋतिक रोशन, वरुण धवन, सलमान खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सारा अली खान, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विकी कौशल, राजकुमार राव या बॉलिवूड कलाकारांनी देखील आर्थिक मदत केली आहे. 

जनता कर्फ्यूदिवशी अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू, लॉकडाऊनमुळे अंत्यदर्शनासही मुकली

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm relief funds actor ranveer singh and deepika padukone donates funds for the fight against coronavirus