पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून अभिनेता आमिर खानचे पंतप्रधानांनी मानले आभार

प्लास्टिक बंदीला आमिर खानचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता आमिर खानचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये  प्लास्टिकचा वापर थांबवावा असं आवाहन देशवासीयांना केलं होतं. २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा वापर करणार नाही असा प्रत्येकानं संकल्प केला पाहिजे असं ते म्हणाले होते. यापूर्वीही भारत प्लास्टिक मुक्त करूयात असं आवाहान मोदींनी देशवासीयांना केलं होतं. 

शिवानीसोबत मैत्री ठेवायला वीणाचा नकार

त्यानंतर आमिरनं ट्विट करत भारत प्लास्टिक मुक्त करण्याच्या पंतप्रधानांच्या मोहिमेला आपण पाठिंबा दिला पाहिजे असं म्हटलं. त्यांनं पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या या मोहिमेचं कौतुक केलं.  आपण यापुढे प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे असं आवाहनही त्यानं तमाम देशवासीयांना आणि त्याच्या चाहत्यांना केलं. यासाठीच मोदींनी आमिर खानचे आभार मानले आहेत.तू या मोहिमाला पाठिंबा दिलास तसेच इतरांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन तू केलं यासाठी मी तुझे आभार मानतो असं मोदी म्हणाले. 

'इंशाअल्लाह'ऐवजी हा चित्रपट होणार ईदला प्रदर्शित

 मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २०१८ साली दिलेल्या माहितीनुसार दरदिवशी भारतात १५ हजार टन प्लास्टिकचा कचरा गोळा होतो. यातील ९ हजार टन प्लास्टिकचा पुर्नवापर केला जातो. मात्र ६ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही. 
हे प्लास्टिक नद्या, समुद्रात वाहून जाते किंवा जमिनीवर राहते. पर्यावरणाला मोठं नुकसान पोहोचवतं म्हणूनच प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत.