पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२५ कोटी देणाऱ्या मोठ्या मनाच्या अक्षयचं पंतप्रधानांकडून कौतुक

अक्षय कुमार- मोदी

कोरोनाविरोधातील लढाईसाठी पीएम केअर फंडला २५ कोटींचा निधी देणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारचं देशभरातून कौतुक होत आहे. एका अभिनेत्यानं दिलेली ही सर्वांत मोठी रक्कम आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी स्वखुशीनं निधी देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी रविवारी केलं होतं. त्यानंतर अल्पावधित अक्षयनं या आवाहनाला प्रतिसाद देत मोठी आर्थिक मदत जाहीर केली. यासाठी अक्षय कुमारचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केलं आहे.

२५ कोटी दान करण्याआधी पत्नी ट्विंकलनं अक्षयला विचारला होता एक प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे  अक्षयचे मदतनिधीसाठी आभार मानले. सुदृढ भारतासाठी अशी मदत करुयात असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं देखील अक्षयचं कौतुक केलं आहे, कारण अक्षयनं एवढी मोठी रक्कम त्याच्या बतच खात्यातून दिली आहे.

ही मदत जाहीर केल्यानंतर हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत  'मदत करणारा मी कोण आहे? ही  मदत माझ्या आईकडून भारत मातेसाठी आहे  असं समजावं', असं अक्षय म्हणाला.

कनिकाची चौथ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, कुटुंबीयांसाठी भावनिक पोस्ट