पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना मदत करण्याचं कपिल शर्माचं आवाहन

कपिल शर्मा

आमिर खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रितेश देशमुख, जिनेलिया नंतर कॉमेडियन कपिल शर्माही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. कपिलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर  एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यानं पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे.

फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानी

पूरामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना शक्य  तितकी मदत करण्यासाठी पुढे या. त्यांना सर्वतोपरी मदत करा असं  आवाहन कपिलनं आपल्या चाहत्यांना आणि देशवासीयांना केलं आहे. 

तर दुसरीकडे त्यानं टीका करणाऱ्या काही युजर्सनांही फटकारलं आहे. प्रश्न मराठी, पंजाबी, मद्रासी असल्याचा नाही आहे. आपण नेहमीच माणूसकीनं वागलं पाहिजे. कठीण काळात एकमेकांना मदत केली पाहिजे असं कपिलनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बिग बॉस मराठी : हे दोन स्पर्धक पोहोचले फिनालेमध्ये

ही मदत करण्याची वेळ आहे अशावेळी काही मुर्ख लोक सोशल मीडियावर चुकीच्या टिप्पणी करत आहेत हे करणं बंद  करावं अशीही विनंतीही कपिलनं केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pls come forward to support your own people comedian kapil sharma ask help for Maharashtra flood victimis