पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी..' चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

तान्हाजी द अनसंग वॉरियर

'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाविरोधात अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघानं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात तानाजी यांच्या मूळ वंशाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली असल्याचा क्षत्रिय कोळी राजपूत संघाचा आरोप आहे.  तानाजी हे कोळी मराठा आहेत मात्र या चित्रपटात ते मराठा असल्याचं दाखवण्यात आलं आहे असा दावा क्षत्रिय कोळी समाजातील याचिकाकर्त्यांचा आहे. 

चित्रपटात योग्य तो बदल होत नाही तोपर्यंत  चित्रपटाला प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. १९ डिसेंबरला या याचिकेची सुनावणी होणार आहे. 

सलमानच्या घरी बॉम्ब, १६ वर्षांचा मुलानं पोलिसांना दिली खोटी माहिती

'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' म्हणणारे तान्हाजी मालुसरेंचं नाव स्वराज्याच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. तहात गेलेला कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणण्याची शपथ त्यांनी घेतली. शेवटच्या श्वासापर्यंत ते कोंढाणा मिळवण्यासाठी लढले. कोंढाणा स्वराज्यात आला पण स्वराज्याचा 'सिंह' गेला. कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची महाराजांची मोहीम  फत्तेह झाली, 'गड आला पण सिंह गेला' म्हणत राजेही हळहळले.

संगीत रंगभूमीवरील 'सावकार'

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगन यानं तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त काजोल, सैफ अली खान, शरद केळकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.