पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पानिपत : मस्तानीबाईंविषयीच्या 'त्या' संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजाचा आक्षेप

 पानिपत

पानिपतच्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील एका दृश्यात मस्तानीबाईंविषयी दाखवलेल्या एका  संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशज नवाब शादाब अली बहादुर यांनी आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री क्रिती सॅनॉन हिच्या तोंडी असलेल्या संवादावर त्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. 

हॉलिवूडमध्ये संधी कशी मिळाली, प्रियांकानं सांगितले त्या दिवसाचे अनुभव

या  चित्रपटात क्रिती सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या पत्नी पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहेत. ''मी ऐकलंय पेशवा जेव्हा एकटे मोहिमेस जातात तेव्हा माघारी येताना एक मस्तानी घेऊनच येतात", अशा आशयाचा हिंदी संवाद क्रितीच्या तोंडी आहे. हा संवाद नवाब शादाब अली बहादुर यांना खटकला आहे. 

'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांचा धमकीवजा इशारा

ज्याप्रकारे हा संवाद चित्रपटात दाखवला आहे त्यामुळे मस्तानी बाई आणि पेशव्यांच्या  प्रतिमेस तडा जातो. ज्यांना मराठ्यांचा इतिहास माहित नाही,  त्यातूनही तरुण्यांच्या मनात चुकीचं चित्र तयार होईल. असे संवाद चित्रपटात वापरणं साफ चुकीचं असल्याचं नवाब शादाब अली बहादुर यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. 

'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक

चित्रपटातून हा संवाद त्वरित काढून टाकण्यासाठी त्यांनी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवली आहे. जर त्वरित हा संवाद काढून टाकला नाही तर हे प्रकरण न्यायालयात जाईन असा इशाराही त्यांनी दिला आहे.