पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉमेडियन कृष्णा अभिषेक म्हणतो, मी आल्यापासून लोक गुत्थीला विसरले

द कपिल शर्मा शो

विनोदवीर सुनील ग्रोव्हरनं कॉमेडी नाइट विथ कपिल शर्मामध्ये साकारलेलं गुत्थी हे स्त्री पात्र तेव्हा सुपरहिट झालं होतं. गुत्थीची लोकप्रियता आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. किंबहुना सुनील ग्रोवर हा गुत्थीच्या भूमिकेसाठीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. मात्र मी कपिल शर्मा शोमध्ये आल्यापासून लोक गुत्थीला विसरले असं कॉमेडियन कृष्णा अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला.

२२ दिवस झाले सासू सासऱ्यांशी संपर्क नाही, कलम ३७० वरून उर्मिला मातोंडकर यांची सरकारवर टीका

कपिल शर्मा शोमध्ये  कृष्णा  सपना हे पात्र साकारत आहे. 'तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र कोणीही सपना आणि गुत्थीची अद्यापही तुलना केलेली नाही. खरं सांगायचं तर मी या शोमध्ये आल्यापासून लोक सुनीलला विसरले आहेत, अशा प्रतिक्रिया मला बहुतांश वेळा ऐकायला मिळतात. सुनील खूप उत्तम अभिनेता आहे. 'असं कृष्णा झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

कृष्णा आणि कपिल शर्मा हे प्रतिस्पर्धी मानले जायचे. मात्र द कपिल शर्मा शोमध्ये कपिलनं कृष्णाला संधी दिली. कपिल आणि सुनील ग्रोव्हरमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर सुनील ग्रोव्हरनं द कपिल शर्मा शोला रामराम ठोकला. कपिलच्या टीमध्ये असलेल्या अली असगरनंही हा शो सोडला. सुनील ग्रोव्हर आणि अलीच्या जाण्यानंतर काही काळानं द कपिल शर्मा शोबंदही झाला होता. 

फत्तेशिकस्त : स्वराज्याच्या शत्रूला नामोहरण करणारा 'सर्जिकल स्ट्राईक'

डिसेंबर २०१८ मध्ये सलमान खानच्या निर्मिती संस्थेनं हा शो पुन्हा सुरू केला. यावेळी कपिलनं भारती आणि कृष्णा या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संधी दिली.