पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो'वर अश्लीलतेचा आरोप, शो बंद करण्याची मागणी

बिग बॉस 'रिअ‍ॅलिटी शो' अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप होत आहे.

Bigg Boss 13 Controversy :  दंबग सलमान खानचा  बिग बॉस हा लोकप्रिय हिंदी रिअॅलिटी शो १३ व्या हंगमाच्या सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसते. यंदाच्या हंगामात शोमध्ये अनेक नाविण्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या बदलानंतर या शोच्या (कार्यक्रम) बंद करावा अशी मागणी जोर धरत आहे. 

२० नोव्हेंबरपासून सुरु होणार ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

ट्विटर वर #Boycott_BigBoss असा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळते. या ट्रेंडच्या माध्यमातून  बिग बॉस वर अश्लीलता पसरवण्याचा आरोप करण्यात येत येत आहे. कार्यक्रमात ट्विस्ट निर्माण करण्यासाठी पुरुष आणि महिला स्पर्धकांची जोडी एक बेड शेअर करताना दाखवण्यात येत आहे. हा प्रकार अश्लीलतेलाच प्रोस्हान देणारा आहे, अशा प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.   

ऋषी कपूर यांनी केले खास फोटोशूट; चाहत्यांची मिळतेय पसंती

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत चुकीचा संदेश पोहचवला जात आहे.  हा कार्यक्रम मनोरंजन करणारा नाही. तसेच यातून कोणताही सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ट्विरच्या माध्यमातून उमटत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. कलर्स टीव्हीवरील या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.