पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘पती पत्नी और वो’ची पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई

पती पत्नी और वो चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई

अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो'ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाने ९ कोटी रुपयांची कमाई केली. आधी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, अशी शक्यता होती. पण त्यापेक्षा चित्रपटाने जास्त पैसे कमावले आहेत.

HTLS 2019 : नरेंद्र मोदींच्या त्या मुलाखतीबद्दल अक्षय कुमार म्हणाला...

१९७८ मध्ये आलेल्या 'पती, पत्नी और वो'चा हा रिमेक आहे. चार दशकांनंतर या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला आहे. मूळ चित्रपटातील कथा आणि विनोद यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांनी सुंदर अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ३० कोटी रुपये खर्च आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे.

NEFT सुविधा १६ डिसेंबरपासून २४ तास सुरू