पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले शिळं अन्न, ठेकेदारास १ लाखांचा दंड

तेजस एक्स्प्रेस

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला शिळे अन्न दिल्याप्रकरणी आयआरसीटीसीनं ठेकेदारास १ लाखांचा दंड ठोठावला आहे. सीएसएमटी ते करमालीदरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये शनिवारी रात्री प्रवाशाला शिळे अन्न देण्यात आले. शताब्दी ट्रेननंतर प्रवाशाला शिळे अन्न देण्याची ही दुसरी घटना आहे. 

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

 ''पुलाव आणि पोळ्या शिळ्या झाल्या होत्या. त्यातून दुर्गंधी येत होती. आम्ही रेल्वेमधील कर्मचाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली, मात्र कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही. मी ते अन्न अर्ध खाल्लं होतं त्यामुळे मला उलट्या झाल्या. मी वैद्यकिय मदतीची मागणी केली मात्र तीदेखील मला मिळाली नाही. ८ प्रवाशांना शिळे अन्न खाऊन उलट्या झाल्या होत्या.'' अशी माहिती ५४ वर्षांचे विलास केळकर यांनी दिली. केळकर ठाणे स्थानकातून तेजस एक्स्प्रेसनं कुडाळला प्रवास करत होते. 

चंद्रावर जाण्यासाठी अब्जाधीशाला हवीये २० वर्षीय गर्लफ्रेंड!

प्रवाशांच्या तक्रारीनंतर ठेकेदासार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तसेच आयआरसीटीसीनं १ लाखांचा दंडही बजावला आहे.  शिळे अन्न खाऊन ट्रेनमधील प्रवाशांना उलट्या झाल्याचं वृत्त आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाकारलं आहे, पुलावमधून दुर्गंधी येत असल्याचं वृत्त खरं आहे, कारण अनेकदा पदार्थ गरम असतानाच पाकिटबंद केले जातात त्यामुळे त्याला वास येऊ शकतो मात्र शिळे अन्न खाऊन उलट्या झाल्याची किंवा डॉक्टरांची मदत मागितल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचं, अधिकाऱ्यांनी सांगितलं.