बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटासाठी ती कठोर मेहनतही घेताना दिसत आहे. चित्रिकरणासाठीचे ट्रेनिंग घेत असताना तिला दुखापत झाल्याची आणि त्यातून सावरल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर आता तिने एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
प्राजक्ता गायकवाड पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही रणरागिणी!
भारतीय बॅडमिंटन स्टारच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारताना तिला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. सरावादरम्यान दुखापतीतून सावरल्यानंतर आता ती थकवा दूर ठेवण्यासाठी फिजिओथेरेपिस्टची देखील मदत घेत आहे. तिने आपली फिजिओथेरेपिस्ट अपूर्वा हिच्यासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रचंड थकवा आल्यानंतर माझी फिजिओथेरेपिस्ट मला पुन्हा तंदूरुस्त करते, अशा आशयाची पोस्ट लिहित तिने अपूर्वाचे अभार मानले आहेत. तिने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लाखाच्या घरात लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.
गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती
उल्लेखनिय आहे की, सायना नेहवालच्या आयुष्यावर अधारित चित्रपटासाठी पहिल्यांदा श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती. चित्रपटाटा फर्स्ट लूक जारी केल्यानंतर श्रद्धा ऐवजी परिणीतीची या चित्रपटात एन्ट्री झाली. 'सायना' असे या चित्रपटाचे नाव असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.