पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या मराठी कलाकाराच्या अभिनयानं प्रभावित झाली परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा सध्या तिच्या 'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिणीतीनं नुकतीच पुण्याला भेट दिली. या भेटीदरम्यान तिनं 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना पुण्यातील काही आठवणीही जागावल्या. 

'केजीएफ २' मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत

''माझा भाऊ पुण्यात शिक्षण घेत होता. मी त्याला भेटायला किंवा चित्रीकरणासाठी पुण्यात अनेकदा आले आहे. आम्ही एमजीरोड परिसरात अनेकदा खायला यायचो. मात्र दुर्दैवानं वेळ कमी असल्यानं फार फिरता आलं नाही. मला इथलं वातावरण खूपच आवडतं'', असं परिणीती म्हणाली. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

मराठी चित्रपटसृष्टीविषयीही तिनं आपलं मत व्यक्त  केलं. या चित्रपटसृष्टीविषयी मला अपार आदर आहे. येथे विषयात वैविध्य पाहायला मिळतं. चित्रपटात आशय असतो. अनेक राष्ट्रीय पुरस्कार मराठी चित्रपटांच्या नावे आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील सचिन खेडेकर हे माझे सर्वात आवडते कलाकार असल्याचंही  तिनं सांगितलं. २०१७ मध्ये परिणीतीनं सचिन खेडेकर यांच्यासोबत एका चित्रपटात काम केलं होतं, त्यांच्या अभिनयानं ती खूपच प्रभावित झाली होती. त्यामुळे या  मुलाखतीत तिनं खेडेकर यांचा आवर्जून उल्लेख केला.