अभिनेत्री परिणिती चोप्राला बॅडमिंटन सरावादरम्यान दुखापत झाली आहे. परिणिती ही फुलराणी सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ती सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी परिणिती खूपच मेहनत घेत आहे. ती सध्या बॅडमिंटनचे धडे घेत आहेत. बॅडमिंटन सरावादरम्यान तिच्या मानेला दुखापत झाली आहे.
राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप
'मला दुखापत होऊ नये म्हणून सायनाची संपूर्ण टीम माझी खूप काळजी घेत आहे. मात्र तरीदेखील हे झालं पुन्हा बॅडमिंटनचा सराव करण्याआधी मला थोडा काळ विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.', अशी पोस्ट परिणितीनं सोशल मीडियावर लिहिली आहे.
यापूर्वी सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर झळकणार होती. मात्र काही कारणानं श्रद्धानं चित्रपट सोडला आणि त्याजागी परिणितीची वर्णी लागली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते करत असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.