पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

जबरिया जोडी चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या 'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता जबरिया जोडी चित्रपट २ ऑगस्ट ऐवजी ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरसोबत प्रदर्शनाची नविन तारीख सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अर्जुन कपूरच्या विरोधात धोनी खेळला फूटबॉल सामना

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस - हॉब्स अ‍ॅ ण्ड शॉ', 'खानदानी शफखाना' बॉक्स ऑफिसवरील 'जजमेंटल है क्या' आणि 'दी लायन किंग' या चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे जबरिया जोडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. ९ ऑगस्ट रोजी कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे निर्मात्याने एका आठवड्याने जबरिया जोडी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. 

...अन सलमान खानने दिला कपिल शर्माला 'हा' सल्ला

जबरिया जोडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणे हे पहिल्यांदा झाले नाही. तर या आधी तीन वेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. पहिल्यांदा १७ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र अजय देवगनच्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटामुळे जबरिया जोडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १२ जुलै करण्यात आली होती. मात्र १२ जुलै रोजी हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे पुन्हा जबरिया जोडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत २ ऑगस्ट करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत ९ ऑगस्ट करण्यात आली आहे.

Discovery वरील प्रसिद्ध 'मॅन वर्सेस वाईल्ड'मध्ये लवकरच नरेंद्र मोदी