पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कूली नं. १' च्या रिमेकमध्ये कादर खान यांच्या भूमिकेत हा अभिनेता

कुली नंबर १ रिमेक

गोविंदा- करिश्माचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कूली नं. १' चा रिमेक येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या रिमेकची अधिकृत घोषणा करण्यात आली. या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली  खान झळकणार आहेत. डेविड धवन यांचं दिग्दर्शन, गोविंदा आणि कादर खान यांच्या धम्माल कॉमेडीची जुगलबंदी  या चित्रपटात होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला  होता. 

चित्रपटाच्या रिमेकमध्ये  वरुण  गोविंदा यांची भूमिका साकारणार आहे तर  सारा अली खान करिश्माच्या भूमिकेत दिसणार आहे.  पण कादर खान यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. गोविंदाच्या जवळपास सगळ्याच चित्रपटात मुलीच्या खडूस बापाची भूमिका ही कादर खान यांनीच साकारली . कादर खान यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं.  रिमेकमध्ये कादर खान यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले गेले. आता परेश रावल या चित्रपटात कादर खान यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अद्यापही या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही  मात्र परेश रावल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे हे नक्की.